breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात रेतीच्या अवैध खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू

चंद्रपूर येथील राष्ट्रवादी नगर परीसरात असलेल्या एमएससीबीच्या मालकीच्या जागेवर रेतीतस्करांनी मोठमोठे खड्डे केले आहे. या खड्ड्यात रेतीखाली दबून २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली आहे. येल्याबाई शंकर कोडापे (२७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिला घरी फरशी लावण्यासाठी पोत्यात भरून खड्यातून रेती नेत होती.

रेती पोत्यात भरत असताना मातीचा ढिगारा तिच्या अंगावर पडून तिचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून येथील नाला परिसरात तस्करांनी मोठमोठे खड्डे केले असून यातून शहरात रेती पोहचविली जाते. यासंदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पोलीस तसेच महसूल प्रशासनाला कळविले आहे. मात्र सर्वानीच दुर्लक्ष केल्यामुळे या खड्डयात महिलेचा नाहक बळी गेला आहे. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button