breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! ऑनलाईन क्लास दरम्यान अल्पवयीन विद्यार्थीनीला अश्लील मजकूर पाठवणारा शिक्षकाला अटक

मुंबई: ऑनलाईन क्लास दरम्यान 10 वर्षीय विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवणाऱ्या शिक्षकाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6-7 सप्टेंबर रोजी ऑनलाईन क्लास सुरु असताना शिक्षकाने विद्यार्थीनीला अश्लील स्टिकर्स पाठवले होते. शिक्षकाने रविवारी 3 स्टिकर्स पाठवले होते. मात्र थोड्या वेळाने ते डिलिट केले. व त्यानंतर सोमवारी देखील शिक्षकाने एक अश्लील स्टिकर पाठवला. विद्यार्थीनीने ही बाब आपल्या पालकांच्या ध्यानात आणून दिली. त्यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

एफआयआर दाखल केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी 14 सप्टेंबर पर्यंत पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. इतर विद्यार्थ्यांसोबतही आरोपीने असे वर्तन केले आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, आरोपीवर भारतीय दंड संहिता अंतर्गत विनयभंग करण्याचा, आयटी अॅक्ट (IT Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वी शिक्षकांनी विद्यार्थींनीवर बलात्कार, विनयभंग केलेल्या अनेक घटना देशातील विविध भागातून समोर आल्या आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणातही असे प्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अद्याप शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन माध्यमातून शिक्षक सुरु आहे. अशा प्रकराच्या घटना पाहता पालकांनी ऑनलाईन क्लासेस दरम्यानही मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button