breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दोन शाळांच्या इमारती बांधण्यासाठी 23 कोटी रुपये खर्चाला स्थायीची मान्यता

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बोऱ्हाडेवाडी व दिघी येथे शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. या दोन्ही शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 23 कोटी रुपये खर्चास स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. प्रभाग क्रमांक 2 बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील गायरानाची जागा ताब्यात येणार आहे. त्यातील आरक्षणावर शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 4 दिघी येथील आरक्षण क्रमांक 2, 122 मध्ये नवीन शाळा इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या.

बोऱ्हाडेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या शाळा बांधकामासाठी 12 कोटी 38 लाख 248 रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार मेसर्स कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सर्वात कमी 5. 10 टक्के दराने निविदा सादर केली. त्यांनी हे काम 11 कोटी 64 लाख 70 हजार 56 रुपये अधिक 7 लाख 79 हजार 200 रुपये रॉयल्टी आणि 2 कोटी 90 हजार 800 रुपये मटेरियल टेस्टिंग चार्जेस असे एकूण 11 कोटी 75 लाख 58 हजार रुपयांमध्ये करुन देण्याचे मान्य केले. त्यामुळे बोऱ्हाडेवाडी येथील शाळेचे बांधकाम या कंपनीला देण्यात आले. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या वतीने दिघी येथे बांधण्यात येणाऱ्या शाळा बांधकामासाठी 12 कोटी 43 लाख 71 हजार 503 रुपये किमतीची निविदा सादर करण्यात आली होती. त्यानुसार मेसर्स एस. एस. साठे या ठेकेदारांने सर्वात कमी म्हणजे 5. 15 दराने निविदा सादर केली. त्यांनी हे काम 11 कोटी 74 लाख 37 हजार 721 रुपये अधिक 5 लाख 2 हजार 203 रॉयल्टी आणि 55 हजार 800 रुपये मटेरियल टेस्टिंग जार्जेस असे एकूण 11 कोटी 79 लाख रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले. त्यामुळे दिघी येथील शाळा बांधण्याचे काम त्यांना देण्यात आले. या दोन्ही शाळा बांधकामांना स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button