breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांची भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार- चंद्रकांत पाटील

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. प्रत्येक पक्षात नेत्यांचे इनकमिंग, आऊटगोईंग हा प्रकार सर्रासपणे सुरु असलेला पाहायला मिळतो आहे. मात्र जेव्हा दोन भिन्न पक्षांचे वा विरोधक एकमेकांची भेट घेतात तेव्हा मात्र चर्चा तर होणारच. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यासोबत कार्यकर्त्यांमुळे अनेक चर्चा रंगू लागल्या. अनेक तर्क वितर्क काढण्यात आलेले होते.

मात्र त्या भेटीनंतर या दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण देत ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष नेते चंद्रकांत पाटील यांनी ‘दोन भिन्न पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भेट ही नक्कीच चहा बिस्कीट साठी नसणार’ असे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या झालेल्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील याबाबत म्हणाले की, ‘ही भेट नक्कीच चहा बिस्कीटसाठी झालेली नसणार. पण त्यात काही अंदाज बांधणेही चुकीचे आहे’ असे म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button