breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘देशात सरकारं पाडणाऱ्या ‘राजकीय विषाणू’चा धुमाकूळ’, शिवसेनेचा भाजपला चिमटा

मुंबई – मध्य प्रदेश व गुजरातमधील आमदार फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींची तुलना शिवसेनेनं ‘करोना’शी केली आहे.

‘देशात सध्या विरोधी पक्षांची सरकारं खिळखिळी करणाऱ्या व पाडणाऱ्या ‘राजकीय विषाणू’ने धुमाकूळ घातला आहे, असा चिमटा शिवसेनेनं भाजपला काढला आहे.

मध्य प्रदेश व गुजरातमधील राजकारणावर शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार तसेच गुजरातमधील चार आमदारांसाठी भाजपनं काय किंमत मोजली हे जनतेला समजायला हवे, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button