breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाविरुद्ध लढाई : पोलिसांचं मनोधैर्य खचवून चालणार नाही. आणि त्यांच्या जर हल्ले होत असतील तर त्या हल्लेखोरांना फोडून काढा: राज ठाकरे

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण असताना काही धर्मांध शक्ती जो धिंगाणा घालत आहेत त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी चांगलाच समाचार घेतला आणि त्यांना इशाराही दिला आहे. पोलिसांचं मनोधैर्य खचवून चालणार नाही. आणि त्यांच्या जर हल्ले होत असतील तर त्या हल्लेखोरांना फोडून काढा, असेही राज यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या माध्यम संवादातील महत्वाचे मुद्दे :

🛑 जर लोकांनी सरकारच्या सूचनांचं नीट पालन केलं नाही तर नाईलाजाने सरकारला लॉकडाऊनचा काळ वाढवावा लागेल आणि त्याचा थेट परिणाम उद्योगधंद्यांवर आणि सरकारच्या तिजोरीवर होणार आहे, आज सरकारी नोकरांचे पगार पण दोन टप्प्यात द्यावे लागत आहे. जर आपण शिस्त नाही पाळली तर खूप मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागणार हे नक्की.

🛑 आज जी लोकं लॉकडाउनच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहेत त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या चिंता आहेत, लॉकडाऊन किती काळ चालेल, नंतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा कसा असेल इथपासून त्यांच्या नोकऱ्यांच काय होणार इथपर्यंत. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना उद्या काय होईल ह्याची चिंता लागून राहिली आहे. त्यात सोशल मीडियातून, आणि विविध माध्यमातून मिळणारी माहिती, रुग्णांचे आकडे ह्याविषयी लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. ह्या सगळ्यावर एका जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती म्हणजेच पंतप्रधान त्यांच्या ‘जनसंवादात’ काही बोलतील अशी मला अपेक्षा होती.

🛑 सध्या घरात लोकं तशीही नुसतीच बसून आहेत त्यामुळे पंतप्रधान म्हणालेत त्याप्रमाणे लोकं दिवे घालवतील, बॅटऱ्या, टॉर्च लावतील जर त्याने काही फरक पडणार असेल तो पडू दे. पण ह्या पेक्षा महत्वाचं होतं ते म्हणजे पंतप्रधानांच्या भाषणात जर येणाऱ्या आर्थिक अरिष्टावर आपण कसं मत करू शकू ह्याबाबत थोडासा आशेचा किरण जरी दिसला असता तरी फरक पडला असता.

🛑 मरकजमधला प्रकार संतापजनकच. ज्यांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा ह्या आपत्तीत काही कारस्थान रचावं असं वाटत असेल तर अशा लोकांवर उपचार करण्यापेक्षा गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. ह्या असल्या लोकांना वेगळं काढून त्यांना फोडून काढ़तानाचे व्हिडीओज व्हायरल झाले पाहिजेत. ह्या धर्मांधांनी लक्षात ठेवावं संचारबंदी थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच.

🛑 वसई मध्ये मरकजला परवानगी नाकारल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन. दिल्ली पोलिसांना ह्याचा धोका लक्षात आला नाही. अर्थात कोणाला दोषी ठरवणं किंवा धर्म इत्यादी विषयांवर बोलण्याची ही वेळ नाही. पण… मुसलमानांमधल्या असल्या ज्या काही औलादी आहेत त्यांना आजच ठेचून काढलं पाहिजे.

🛑 निवडणुकीच्या वेळेस मुल्ला मौलवी मतदान कुणाला करावं ह्याचे फतवे काढतात. ते आत्ता का गप्प आहेत आणि मग जर ह्यांच्या असल्या धिंगाण्यावर उद्या सरकारने काही कडक कारवाई केली किंवा एखाद्या पक्षाने समजा काही भूमिका घेतली तर तेंव्हा काही बोलायचं नाही. ह्यांचं आपल्या मराठी मधल्या म्हणीसारखं आहे ‘कारलं तुपात घोळवा की साखरेत घोळवा ते कडू ते कडूच राहणार.’

🛑 डॉक्टर्स असोत, शेतकरी असोत, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी असोत,पोलीस असोत किंवा अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी असोत की माध्यमातील कर्मचारी असोत जीवावर उदार होऊन काम करत आहेत.

🛑 जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहचव्यात ह्यासाठी सरकारने अधिक योग्य नियोजन करायला हवं.. आणि ह्या काळात काळा बाजार करणाऱ्यांना फोडून काढल पाहिजे.

🛑 लोकांनी पण जर त्यांना कोरोनासदृश्य काही लक्षणं आढळली तर त्यांनी लपवू नयेत. सरकारला, यंत्रणेला मदत करावी.

🛑 माझी लोकांना हात जोडून विनंती आहे की हा लॉकडाऊन गांभीर्याने घ्या. कारण जर आज तुम्ही गांभीर्याने नाही घेतलं तरी सरकारला नाईलाजाने लॉकडाऊन वाढवावा लागेल आणि त्याचा आर्थिक परिणाम गंभीर असतील.

🛑 आजपर्यंत सर्व सरकारांनी आरोग्य व्यवस्थेकडे पुरेसं लक्ष दिलं नाहीये, त्यामुळे आजची परिस्थिती गंभीर आहे. किमान भविष्यात तरी आरोग्यावर बजेटमध्ये मोठी तरतूद असायला हवी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button