breaking-newsराष्ट्रिय

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या दिशेने

नवी दिल्ली : देशभरात एका दिवसात सापडणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचे नवनवे विक्रम रचले जात आहेत. गुरुवारच्या दिवसात भारतात 26 हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले. पहिल्यांदाच एका दिवसातील रुग्णसंख्येने फक्त 25 नाही, तर थेट 26 हजाराचा टप्पा ओलांडला.

कालच्या दिवसात (गुरुवार 9 जुलै) देशात 26 हजार 506 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 वर गेला आहे.

7 जुलैला भारताने सात लाख रुग्णांचा आकडा पार केला होता. मात्र याच वेगाने नवीन रुग्ण आढळत राहिल्यास देशात पुढील 24 तासात आठ लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणजेच अवघ्या चार दिवसात एक लाखाने रुग्णसंख्या वाढेल.

गेल्या 24 तासात देशात 475 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 21 हजार 604 कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

भारतात सध्या 2 लाख 76 हजार 685 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 लाख 95 हजार 513 जण कोरोनामुक्त झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

भारतात सलग सहाव्या दिवशी (24 तासात) 21 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आणि चारशेपेक्षा अधिक कोरोनाबळी गेले आहेत. गेल्या आठवड्याभरात पाचव्यांदा एका दिवसात सर्वाधिक सापडण्याचा विक्रम नोंदवला गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button