breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुस-याकडे बोट दाखवण्याअगोदर भाजपने स्वतःकडे निरखून पहावे – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षात महापालिकेमध्ये ज्या गोष्टीसाठी भाजप आरडाओरड करत होते. त्याच गोष्टी पुन्हा-पुन्हा होत आहेत. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळलेला दिसत आहे. त्याची ओरड होत आहे. इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा भाजपने आता स्वत:कडे पाहून आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना उद्देशून दिला.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मंगळवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी वायसीएमच्या कारभाराची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर शरसंधान साधले.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/1364799977055885/

कोल्हे म्हणाले की, महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले आहे. महिलांवरील अत्याचार दुर्दैवी आहेत. ते रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, भाजपने मागील पाच वर्षातील कार्यकाळाचा लेखाजोखा जरी समोर मांडला. तरीसुद्धा त्यांना कशाबद्दल नक्की आंदोलन करत आहोत हा संभ्रम पडेल, असा टोलाही खासदार कोल्हे यांनी लगावला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत विकास कामांच्या नावाखाली गोलमाल सुरू आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफळला. त्यावर बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ठराविक लोकांच्या म्हणण्यानुसार जर गोष्टी होत असतील. तर, त्यामध्ये अस्वस्थता नक्की येते. परंतु, अस्वस्थतेला या पद्धतीने वाट मिळणे दुर्देवी आहे. परंतु, ही वाट का निर्माण झाली. अस्वस्थता, असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांच्या मनात का निर्माण होते. याचा विचार देखील राज्यकर्त्यांनी अंतर्मुख होऊन करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिल्लीश्वरांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button