breaking-newsमनोरंजन

दीपिकाच्या बिल्डिंगमध्ये रणवीरने घेतलं घर; भाडं वाचून व्हाल थक्क!

अभिनेता रणवीर सिंगने मुंबईतील प्रभादेवी इथल्या बोमंड टॉवर्समध्ये भाड्याने फ्लॅट घेतला आहे. रणवीरची पत्नी अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फ्लॅट याच इमारतीत आहे. या ३३ मजली इमारतीत २६ व्या मजल्यावर दीपिकाचा 4BHK फ्लॅट आहे. २०१० साली तिने तब्बल १६ कोटींना हा फ्लॅट विकत घेतलेला होता.

नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रणवीरने तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. पहिल्या दोन वर्षांसाठी तो तब्बल ७ लाख २५ हजार रुपये प्रति महिना भाडं देणार आहे. त्यानंतर तीसऱ्या वर्षासाठी भाड्याची किंमत वाढून ७ लाख ९७ हजार रुपये प्रति महिना भाडं तो देणार आहे. इतकी मोठी किंमत मोजून रणवीरने त्याच इमारतीत घर भाड्याने का घेतलं हे मात्र अद्याप समजलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button