breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दीपक कोचर यांची १९ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत रवानगी

आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दीपक कोचर यांची रवानगी १९ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत करण्यात आली आहे. आयसीआयसीआयच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. विशेष PMLA कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने सोमवारी अटक केली. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात ही कारवाई ईडीने केली. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button