breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दिसेल त्याला पक्षात घेणं, हे भाजप-शिवसेनेचे हास्यास्पद धोरण – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

पुणे  – दिसेल त्याला पक्षात घेणे हे भाजप शिवसेनेचे धोरण हास्यास्पद असल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.  पुण्यात ते बोलत होते.

आज (शनिवारी) पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुलाखती घेण्यात येत आहेत. पुणे आणि आजूबाजूच्या मतदारसंघांकरिता पाटील स्वतः मुलाखती घेत आहेत. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून सर्वाधिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजप किंवा सेनेची वाट धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

ते म्हणाले की, ‘ सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ’. तसेच ‘युतीत मुख्यमंत्री कोण अशी स्पर्धा सुरु आहे. युती एकच असताना दोन मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे’. हा प्रकार पहिल्यांदाच बघत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button