मनोरंजनमुंबई

‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील या अभिनेत्रीची झाली एगेंजमेंट, पहा कोण आहे ती …

मुंबई | महाईन्यूज |

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणारी ,निरागस ,अशी अ‍ॅना म्हणजेच पूजा ठोंबरे हिच्या अभिनयाचे कौतुक सगळीकडेच झाले होते. अ‍ॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली होती. त्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून रसिकांच्या भेटीला आली होती.

पूजा ठोंबरेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ही माहिती खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर दिली आहे.पूजा ठोंबरे हिचा १४ डिसेंबरला नाशिक येथील नामपूर येथे कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला. पूजा व कुणाल यांचे साखरपुड्यातील कपडे अभिनेत्री आरती वबडगावकर हिने डिझाईन केलेले होते. ही माहिती त्या दोघांनी इंस्टाग्रामवर दिली आहे.हा सोहळा कौटुंबिक पद्धतीने पार पडला. त्या दोघांच्या फोटोवर इंस्टाग्रामवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतोय. आता हे दोघं लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. येथील केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे. मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत तिने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button