breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील मंडपवाले, केटरर्सकडे काळ्या पैशाचे घबाड

  • प्राप्तीकराच्या छाप्यात 100 कोटी जप्त

नवी दिल्ली – दिल्लीतील मंडप कंत्राटदाराकडून प्राप्तीकर विभागाने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक काळा पैसा उघड केला आहे. प्राप्तीकर विभागाने आठवडाभर घातलेल्या छाप्यांमध्ये बरीच बेहिशोबी मालमत्ताही उघड झाली आहे. प्राप्तीकर विभागाने एकूण तीन कंत्राटदारांशी संबंधित 43 ठिकाणी छापे घातले तर काही ठिकाणांची केवळ तपासणी केली. प्राप्तीकर विभागाच्या दिल्लीतील तपास शाखेच्या पथकाने 3 मे पासून ही तपास मोहिम सुरू केली होती. या तपासात आतापर्यंत 1.82 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 2.4 कोटी रुपयांचे दागदागिने जप्त करण्यात आले आहेत. सुमारे 15 बॅंक लॉकर गोठवण्यात आले असून यातील काळा पैसा किंवा बेहिशोबी उत्पन्नाची रक्कम 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

दिल्ली आणि राजधानीच्या परिसरातील अतिश्रीमंतांच्या विवाह सोहळ्यांची व्यवस्था करणारे विवाह मंडप, केटरिंग कंत्राटदारांवर ही कारवाई करण्यात आली. हे मंडप आणि केटरिंग कंत्राटदार प्रामुख्याने रोखीचे व्यवहार करतात असे प्राप्तीकर विभागाच्या लक्षात आले होते. या व्यवहारांसाठी एसएमएस आणि व्हॉट्‌स ऍपद्वारे चॅटद्वारे संभाषण चालत असे. यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल फोनही प्राप्तीकर विभागाने ताब्यात घेतले आहेत. मोबाईलमधील मेसेजेसच्या आधारे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे मंडप आणि केटरिंग उद्योजक अनेक वर्षांपासून आपल्या सेवांवर लागू होणारे कर चुकवत होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

यातील काही व्यवसायिक कर चुकवण्यासाठी बनावट कंपन्यांच्या नावाने खरेदी विक्री केल्याचे दाखवत असत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button