breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

दिलीप कुमार यांचे लहान बंधू एहसान खान यांचेही कोरोनाने निधन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू एहसान खान यांचे काल (बुधवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कोरोनाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. एहसान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. दुर्दैवाची बाब म्हणजे १२ दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांचे दुसरे भाऊ अस्लम खान यांचाही कोरोनाने लीलावती रुग्णालयातच मृत्यू झाला होता.

लीलावती रुग्णालयात एहसान खान यांच्यावर डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. कोरोनाची लागण त्यात अन्य आजारांचाही त्रास यामुळे एहसान यांची प्रकृती खालावत गेली होती एहसान खान हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अल्झायमरने त्रस्त होते. कोरोनामुळे गुंतागुंत वाढून त्यातच त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू अस्लम खान यांचेही कोरोनामुळेच २१ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. अस्लम हेसुद्धा लीलावती रुग्णालयातच उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनामुळेच त्यांना प्राणास मुकावे लागले होते. अस्लम यांच्या निधनानंतर १२ दिवसांत दुसरा भाऊही कोरोनाने गमवावा लागल्याने दिलीप कुमार आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button