breaking-newsराष्ट्रिय

दारू पिउन विमान उडवण्याच्या होते तयारीत

नवी दिल्ली: डीजीसीए (डिरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल ऍव्हिएशन- नागरी उड्डाण महासंचलनालय) ने एयर इंडियाचे ज्येष्ठ पायलट अरविंद कठपालिया यांचे लायसन्स तीन वर्षांसाठी रद्द केले आहे. रविवारी दिल्ली-लंडन (एआय 111) या आपल्या उड्डाण कामगिरीवर जाण्यापूर्वी अरविंद कठपालिया मद्यपान केलेल्या अवस्थेत सापडले होते. अरविंद कठपालिया हे एयर इंडियाच्या संचालक मंडळात संचालक (ऑपरेशन्स) आहेत. गेल्या वर्षी अशाच प्रकारात त्यांचे तीन महिन्यांसाठी निलंबन करून कार्यकारी संचालक (ऑपरेशन्स) पदावरून संचालक म्हणून पदावनती करण्यात आली होती.

डीजीसीए च्या नियमांनुसार चालक दलाचा कोणताही सदस्य उड्डाण करण्यापूर्वी किमान 12तास मद्यपान करू शकत नाही. प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी त्याची ब्रीद ऍनेलायझर टेस्ट घेण्यात येते. या ब्रीद ऍनेलायजर टेस्टमध्ये प्रथम “फेल’ झाल्यावर त्याचे लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येते आणि दुसऱ्या वेळी तीन वर्षांसाठी रद्द करण्यात येते. तिसऱ्यांदा ब्रीद ऍनेलायझर टेस्टमध्ये “फेल’ झाल्यास त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button