breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर बाळाचा जन्म

दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी अचानक एक महिला प्रसूत झाली. गीता दीपक वागारे (२१) असे या महिलेचे नाव आहे. गीता तिच्या नवऱ्यासह पुण्याला निघाली होती. दोघे नवरा-बायको ट्रेनची वाट पाहत थांबलेले असताना अचानक गीताला प्रसूती वेदना सुरु झाल्या.

ANI

@ANI

Mumbai: Geeta Deepak Wagare, a 21-year-old gave birth to a baby
on the platform of Dadar Railway station on December 24. Geeta was waiting for a train to Pune with her husband. Both the mother and the baby were later admitted to hospital for further treatment.

27 people are talking about this

त्यामुळे दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरच गीताची प्रसूती करावी लागली. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दादर रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात सलमा शेख या महिलेने दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एका सुंदर मुलीला जन्म दिला होता.

सलमा सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये होती. ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर थांबलेली असताना अचानक तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. ट्रेनमधून उतरल्यानंतर प्लॅटफॉर्मवरच तिने गोंडस मुलीला जन्म दिला. प्लॅटफार्मवर अचानक झालेल्या प्रसूतीनंतर सलमा आणि तिच्या मुलीला नजीकच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button