breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दाट लोकवस्तीतून जाणा-या रिंगरोडचे पुनःसर्वेक्षण करु – मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्याची भेट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून शहरात रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्या रिंगरोडमधील बाधित नागरिकांचा नक्की विचार करुन दाट लोकवस्तीतून जाणा-या मार्गावर रिंगरोड मार्गाचे पुनःसर्वेक्षण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला आज (सोमवारी) दिले. 

चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर स्मारकाच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (सोमवारी) पिंपरी चिंचवड शहराच्या दाै-यावर आले होते. मुख्यमंत्री शहरात आल्यानंतर घर बचाव संघर्ष समिती शिष्टमंडळाने पिंपरीतील एका खाजगी हाॅटेलमध्ये भेट घेतली. यावेळी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, शिवाजी ईबितदार, रेखा भोळे, उमाकांत सोनवणे, नारायण चिघळीकर, अमरसिंग आदीयाल,राजू गायकवाड, आशा पाटील, गोपाळ बिरारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर, अमोल थोरात, अमर मूलचंदानी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान  घर बचाव संघर्ष समितीचे विजय पाटील यांनी रिंग रोड पुनःसर्वेक्षण करून पर्यायी मार्गाने वळविण्यात यावा, यामूळे साडे तीन हजार घरे धारकांना न्याय मिळेल, शास्तिकर रद्द करावा, अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी ऑक्टोबर २०१७ चा प्रशमन कायदयामधील जाचक अटी शिथिल कराव्या. तसेच दंडशुल्क कमी करावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”रिंगरोड बधितांचा विचार करण्यात येईल, दाट लोकवस्तीतून जाणाऱ्या मार्गाकरिता पुनः सर्वेक्षण  केले जाईल. त्याचप्रमाणे शहर सुधारित विकास आराखडा औरंगाबाद नगररचना १५ सदस्य टीमचे कार्य त्वरित कार्यान्वित केले जाईल. दंडशुल्क आणि शास्तीबाबत नागरी हिताचा विचार नक्की केला जाईल. त्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.
भोसरी येथील मुख्यमंत्री दौऱ्याचा अनुभव घेऊन पोलीस प्रशासनाने मोठी दक्षता घेतली.  घर बचाव संघर्ष समिती शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर घडवून आणली. कोंडी फोडण्यास त्यांना यश आले.  नागरिकांची भेट घडवून आणण्यासाठी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त राम मांडुरके, सतीश पाटील, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी विशेष प्रयत्न केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button