breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दाऊदचा एकेकाळचा हस्तक एजाज लकडावाला अटकेत, मुंबई पोलिसांची कारवाई

पाटणा | दाऊद इब्राहिमचा जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावर लकडावालाला अटक केली. अटकेनंतर लकडावालाला न्यायालयाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती.

मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. एजाज लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याने दाऊद इब्राहिम नाराज होता. त्यामुळेच दाऊद इब्राहिमने त्यांच्यावर हल्ला केला होता. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्ष तो तेथेच राहत होता. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button