breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
दहावीचा निकाल आणण्यास गेलेल्या विद्यार्थी बेपत्ता
पिंपळे गुरव – दहावीचा निकाल शाळेतून आणतो असे आजीला सांगून घराबाहेर पडलेला विद्यार्थी शनिवार (दि.८) पासून बेपत्ता झाला आहे. ही घटना पिंपळेगुरवमध्ये घडली.
याप्रकरणी ६५ वर्षीय वयोवृध्द आजीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा हा आजीसोबत सांगवी परिसरात राहत होता. शनिवार दहावीचा निकाल जाहिर झाल्यानंतर त्याने आजीला पिंपळेगुरव येथील प्राथमिक शाळेतून निकाल घेऊन येतो असे सांगून गेला. मात्र तीन दिवस उलटून देखील तो घरी परतलेला नाही. प्रत्यक्षात तो दहावीत काही विषयांमध्ये नापास झाल्याने निघून गेला आहे असे बोलले जात आहेत. सांगवी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.