दत्ता साने यांच्या संपर्क कार्यालय तोडफोडीचा तपास आता चिखली पोलिसांकडे, उपोषण मागे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर 7 जून रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तपासात मुख्य गुन्हेगारांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत साने यांनी पोलीस आयुक्तालयाच्या समोर कुटुंबासह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आज साने आणि त्यांच्या पत्नी उपोषणाला बसण्यापूर्वीच पोलिसांकडून योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतर साने यांनी उपोषणाचा पवित्रा मागे घेतला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीसांनी योग्य दिशेने केला नाही, असा पोलीसांवर आरोप करीत दत्ता साने त्यांच्या कुटूंबियांसह सोमवार (दि. 2) आमरण उपोषण करणार होते. तत्पुर्वी आज सोमवारी सकाळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दत्ता साने यांच्याशी संवाद साधला. या विषयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे. असे सांगितले आणि या गुन्हाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे हे करतील. त्यानंतर दत्ता साने यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.