breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘त्या’८२ वर्षीय आजींच मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई | कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढत जात आहे. या रूग्णांमुळे एक सकारात्मक विचार समाजामध्ये पसरत आहे. संपूर्ण जगाला वेढीस धरलेल्या कोरोनावर आपण यशस्वी मात करू शकतो हा विश्वास या रूग्णांमार्फत समाजात पसरत आहे. असं असताना एका ८२ वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/301821047481574/

या आजींचा व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केला असून आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांच कौतुक देखील केलं आहे. कोरोनावर मात करून ठणठणीत बऱ्या झाल्यावर आजी आपल्या घरी पोहोचल्या. यावेळी त्यांना पोलिसांच्या गाडीतून आपल्या घरी पोहोचवण्यात आलं. पोलिसांकडून आणि आजींच्या नातेवाईकांनी, परिसरातील लोकांनी आजींच मनापासून स्वागत केलं. हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button