breaking-newsपिंपरी / चिंचवड

तोंडाला मास्क लावला नाही म्हणून चिंचवडमध्ये एकाला बेदम मारहाण

पिंपरी | महाईन्यूज |प्रतिनिधी

कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण शहर सुरक्षिततेच्या छायेखाली आहे. अशातच तोंडाला मास्क न लावता बाहेर फिरणा-या एकाला तिघांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी तिघांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टी याठिकाणी गुरूवारी (दि. 25) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

याप्रकरणी भास्कर गायकवाड, अतिष जगताप, प्रेम जगताप (सर्व रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अजय बाळू पालके (वय 26, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजय पालके यांचा भाऊ आनंदनगर झोपडपट्टी भागात तोंडाला मास्क न लावता फिरत होता. त्यावेळी भास्कर, अतिष आणि प्रेम यांनी मिळून त्याला शिवीगाळ केली. तोंडाला मास्क लावण्याचा तगादा लावला असता त्यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावरून तिघांनी मिळून अजय यांच्या भावाला बेदम मारहाण करून धमकी दिली. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button