breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

..तेव्हा ओरडून घसा कोरडा व्हायचा, म्हणून कोणीतरी लेमनच्या गोळ्या द्यायचे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – भाजपाने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी देत सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या काळात एक हाती सत्ता असणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तब्बल साडेपाच वर्षानंतर विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन करताना पहिल्यांदाच दिसले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या आठवणी सांगत भाजपला टोला लगावला.

विधिमंडळ सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधकांची ही घोषणाबाजी सभागृहात जाणारा प्रत्येक मंत्री पाहत होता. अजित पवार यांनी नेमका हाच धागा पकडत भाजपाच्या आजच्या आंदोलनाविषयी बोलताना जुन्या आठवणी सांगितल्या. भाजपाचं आंदोलन होत असताना मला गेल्या पाच वर्षातल्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळी आधीच्या सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन करत असायचो.  त्यावेळी घोषणाबाजी करताना घसा कोरडा व्हायचा आणि मग कोणीतरी लेमनच्या गोळ्या देत असे. अशी आठवण सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button