breaking-newsराष्ट्रिय

तेजबहादुर यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; उमेदवारी अर्जाबाबतची याचिका फेटाळली

माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या बाद उमेदवारी अर्जाबाबत दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी (दि.९) सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे यादव यांना झटका बसला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. अर्ज फेटाळताना या याचिकेत तथ्य आढळले नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

ANI

@ANI

Supreme Court dismisses plea of former BSF constable & SP candidate Tej Bahadur Yadav (in file pic)against rejection of his nomination from Varanasi LS constituency. A Bench headed by CJI Gogoi dismissing the plea said, “We don’t find any merit to entertain this petition”

४३६ लोक याविषयी बोलत आहेत

तेजबहादूर यादव यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर निवडणूक आयोगावर आरोप करीत त्यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी आरोप केला होता की, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असलेल्या मोदींना सहज विजय मिळवता यावा यासाठी आपला अर्ज बाद करण्यात आला आहे.

याप्रकरणी वाराणसीचे निवडणूक अधिकारी राजेश कुमार म्हणाले, निवडणूक लढवताना यादव यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नव्हती. जे सरकारी कर्मचारी आहेत तसेच अशा कर्मचाऱ्यांना जर सेवेतून काढून किंवा बडतर्फ करण्यात आले असेल तर तशी माहिती आयोगाला देणे आवश्यक आहे.

यादव हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना सैन्यात जवानांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांचा हा तक्रार करणारा व्हिडिओ २०१७मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button