breaking-newsराष्ट्रिय

तीन मजली असणार राम मंदिर, नवीन डिझाईन आले समोर

राम मंदिर आता तीन मजली स्वरुपात असणार आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा नियोजित आता राम मंदिर अधिक भव्य दिव्य असणार आहे. नव्या डिझाईमध्ये मंदिराचा मोठा कळस असणार आहे.

राम मंदिराची पहिली डिझाईन 1985-86 मध्ये बनवण्यात आली होती. ही डिझाईन तत्कालीन भाविकांच्या संख्येकडे पाहून बनवली होती. आता भाविकांची संख्या वाढू शकते म्हणून या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या डिझाईमध्ये मंदिराची लांबी रुंदी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर अधिक भव्य दिव्य होणार आहे.

पूर्वी नियोजित राम मंदिर दोन मजली होते, आता राम मंदिर तीन मजली असणार आहे. ज्यांची ऊंची 161 फूट तर लांबी 360 फूट असणार आहे. तसेच मंदीर 235 फूट रुंद असणार आहे. मंदिरात तीन कळस वाढवण्यात आले आहे. पूर्वी मंदिराची उंची 128 फूट होती आता ती 161 फूट मंदिर असणार आहे. तीन मजली मंदिरात 318 खांब असणार आहे. प्रत्येक मजल्यावर 106 खांब असणार आहेत. राम मंदिर जमीनीपासून 17 फूट उंचीवर असेल. दुसर्‍या मजल्यावर राम दरबार असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button