पुणेमहाराष्ट्र

तिसऱ्या मेट्रो प्रकल्पाचे कामही येणार “ट्रॅक’वर

पुणे  – पुणे महानगर प्राधिकरण विकास क्षेत्र यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग क्रमांक-3 चे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प होत आहे. “पीएमआरडीए’ आणि टाटा-सिमेन्स यांच्यात सवलत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या कामाला गती मिळेल, असा विश्‍वास “पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार यांनी व्यक्त केले.

सवलत करार झाल्यानंतर पत्रकार परिषदेत कुमार बोलत होते. यावेळी टाटा रियल्टी ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडचे विनायक देशपांडे, सिमेन्स व्हेन्चर्स जीएमबीएचचे आलोक कुमार, पीएमआरडीच्या अपर मुख्यकार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी व मुख्य अभियंता विवेक खरवडकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button