breaking-newsराष्ट्रिय

तालिबानच्या हल्ल्यात 30 अफगाणी सैनिक ठार, अनेक जखमी.

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानी दशशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील फराह शहरावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 30 अफगाण सैनिक मारले गेले असून अनेक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ईराणच्या सीमेजवळील फराह प्रांताच्या फराह या राजधानीच्या शहरावर तालिबानींनी हल्ला केला, अफगाणी सैनिकांच्या अनेक चौक्‍या त्यांनी उध्वस्त केल्या. मंगळवारी सकाळी तालिबाने दहशतवाद्यांनी फराह शहरावर हल्ला केला.

शहरभर गोळीबाराचे आवाज येत होते फराह प्रांताचे प्रमुख बखतवार यांनी सांगितले आहे. फराह प्रांताचे खासदार मोहम्मद सरवर मुजाहिद यांनी तालिबानी हल्ल्याची पुष्टी केली आहे.

तालिबानींनी अनेक बाजूंनी हल्ला करत अनेक चौक्‍या नष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली आहे, हेलमंड प्रांतातील अनेक्‍ल जिल्ह्यावर तालिबानींचे नियंत्रण आहे. हेलमंड प्रांताची सीमा फराहला लागून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button