breaking-newsताज्या घडामोडीपुणे

…तर ४८० तारादुतांसह बारामतीत आंदोलन करू – संतोष शिंदे

संभाजी ब्रिगेडचे पुण्यात ठिय्या आंदोलन

पुणे | प्रतिनिधी

सारथी संस्था ‘बंद’ करून तारादूतांना देशोधडीला लावण्याचा प्रकार महाआघाडी सरकारने करू नये. अन्यथा, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. ४८० तारादूतांना तात्काळ नियुक्त्या द्या. महाराष्ट्रातील मुलांच्या जिवाशी कोणीही खेळू नये. अन्यथा तारादूत घेऊन आम्ही बारामतीत आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिला. पुण्यात सारथी संस्था बंद केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी त्यांनी इशारा दिला.

सारथी संस्थेचे प्रमुख जबाबदारी सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र तरीही सारथी संस्था किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाही. तारा दूध म्हणून मुला-मुलींच्या नेमणुका झाल्या. मात्र त्यांना एक वर्ष उलटून गेले असताना सुद्धा नियुक्त्या दिल्या नाहीत. हे ठाकरे सरकारचे अपयश आहे. याउलट प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे 17 मार्च रोजी तारादूतांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. असा अजब फतवा सरकारच्या वतीने काढण्यात आला. हे निषेधार्ह आहे.

राज्यातील तरुणांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. तारादूत प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी सारथी कार्यालयासमोर तारादूतांचे वर्षातून दुसरे ठिय्या आंदोलन सुरू आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक जाणिवा, मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलं. जर वेळेत मागण्या मान्य झाल्या नाही, तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सगळ्या ४८० तारादूत मुला-मुलींना घेऊन बारामतीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

सारथी संस्थेसमोर तारादूतांच्या नियुक्त्या कराव्यात म्हणून पुण्यात शेकडो मुले व मुली आंदोलन करत आहेत. त्याठिकाणी त्यांच्याकडे राहण्याची व खाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत मुले कुडकुडत आंदोलनाला बसलेले आहेत. मात्र सारथी संस्था प्रशासन व मुख्य व्यवस्थापक अशोक काकडे विद्यार्थ्यांना कुठलीही मदत करत नाहीत किंवा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा देखील करत नाही. कदाचित विद्यार्थ्यांच्या जीवावर हे आंदोलन बेतू शकते.

सारथी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत ग्रामीण भागात गावा गावा पर्यंत पोहोचण्यासाठी तारादूतांच्या नेमणूका करण्यात आल्या, मात्र त्यांना नियुक्त न देणे हे सरकारचे अपयश आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने पुण्यातील आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, मंदार बहिरट, विनायक घुले, मोहिनी रणदिवे, अतुल येवले, निलेश ढगे, बाळू थोपटे, पप्पू पांडव व जयदिप रणदिवे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button