breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी भोसरीतील तरुणावर गुन्हा दाखल

भोसरी, (महा-ई-न्यूज) – जबरदस्ती लॉजवर नेवून एका तरुणाने २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.१७) ते रविवारी (दि.१८) नोव्हेंबर दरम्यान दिघीतील दिप लॉज येथे घडली.

याप्रकरणी पिडित २३ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अमित प्यामप्यारे गोंड (वय २७, रा. शिवगणेशनगर, धावडेवस्ती, भोसरी) या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पिडित तरुणी घराबाहेर गेली असता आरोपी अमित याने तिचा पाठलाग केला. तसेच तिला गाठून  धमकावूले आणि जबरदस्तीने दिघीतील दिप लॉज येथे नेले. तेथे अमितने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये अमित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमितला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button