breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तब्बल 813 अर्जदारांसाठी पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची सोडत

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पवनाथडी जत्रेतील स्टॉल देण्यासाठी आज सोडत काढण्यात आली. 820 अर्जदारांपैकी 813 अर्जदार पात्र ठरले असून या अर्जदारांना शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीसाठी हे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शहरातील महिला बचत गटांनी घरी बनविलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी महापालिकेच्या वतीने 4 ते 8 जानेवारी दरम्यान सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. त्यातील स्टॉल देण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभागाने अर्ज मागविले होते. 15 ते 24 डिसेंबर दरम्यान तब्बल 820 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 7 अर्ज कागदपत्रांअभावी अपात्र ठरले, तर 813 अर्ज पात्र ठरले. त्यांना स्टॉल देण्याची सोडत महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या हस्ते काढण्यात आली.

दहा बाय दहा अकाराचे 450 स्टॉल्स अर्जदार महिला बचत गटांना वाटप केले जाणार आहेत. या स्टॉलद्वारे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची विक्री केली जाणार आहे. ही सोडत काढताना महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, सदस्या आरती चोंधे, स्वाती काटे, मोरेश्वर शेडगे यांच्यासह 42 महिला बचत गटातील प्रातिनिधीक महिला उपस्थित होत्या, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button