breaking-newsपुणे

‘ड्राय डे’च्या दिवशी दारू पिणं पडले महागात

पुणे:- ‘ड्राय डे’च्या दिवशी ऑनलाइन दारू खरेदी करणाऱ्या एकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे शनिवारी (दि. ९) घडली.

पियाली दुलाल कर (वय ३२, रा. पेबल्स सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पियाली यांनी ऑनलाइन घुले वाईन शॉप यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र आज ड्राय डे असल्याने तुम्ही ऑनलाइन बुकींग करा, मी आपल्या पत्त्यावर दारू पाठवितो, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यानुसार फिर्यादी पियाली यांनी ओटीपी नंबर शेअर केला असता त्यांच्या बँक खात्यातून प्रथम ३१ हजार ७७७ आणि त्यानंतर १९ हजार १ रुपये असे एकूण ५० हजार ७७८ रुपये काढून घेतले आणि दारू न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button