breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातला ‘हा’ भक्त त्यांची देव म्हणून करतो पुजा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये विशेष तयारी सुरू आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये मोठी लगबग सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक चाहते आहेत. मात्र भारतातही ट्रम्प यांचा एक मोठा चाहता वर्ग असल्याचं समोर आलं आहे… बूसा कृष्णा असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतातील चाहत्याचं नाव असून तो तेलंगणातील जनगावमध्ये राहतो. बूसा कृष्णासाठी ट्रम्प देव असून त्याने घराबाहेर त्याची एक मूर्ती देखील उभारली आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये असतील. त्यांच्या दौऱ्यावर 100 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ट्रम्प भारत दौऱ्यावर आल्यानंतर बूसा कृष्णाची त्यांना भेटण्याची इच्छा आहे. केंद्र सरकारकडे त्याने यासाठी विनंतीही केली आहे. गेल्या वर्षी घराबाहेर बूसा कृष्णाने ट्रम्प यांची 6 उंचीची मूर्ती बसवली आहे. तो दररोज मूर्तीची पूजा करतो. विशेष म्हणजे ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून दर शुक्रवारी त्याचं खास व्रत असतं. 

‘भारत आणि अमेरिकेचे संबंध असेच चांगले आणि मजबूत राहावेत असे मला वाटते ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी व्रत ठेवतो. त्यांचा एक फोटोही माझ्यासोबत सतत असतो’ असं बूसा कृष्णाने म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधल्या झोपड्यांसमोर भिंत उभारल्याची घटना ताजी असताना नव्या मोटेरा स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या 45 कुटुंबांना घरं रिकामी करण्याची नोटीस अहमदाबाद महानगरपालिकेनं पाठवली आहे. यासाठी संबंधितांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये येत आहेत. मोटेरा स्टेडियमजवळ असलेल्या 45 झोपड्यांमध्ये जवळपास 200 जण वास्तव्यास आहेत. हे सर्व जण नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button