breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद; खरी देशसेवा: आमदार महेश लांडगे

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोना सारख्या काळात समाजाच्या हितासाठी सर्व डॉक्टरांनी अनमोल कार्य केले आहे. ही मोठी देशसेवा व कौतुकास्पद कामगिरी आहे, असे गौरवोद्गार भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी काढले.

भाजपा युवा मोर्चा पिंपरी- चिंचवड यांच्या वतीने अध्यक्ष संकेत चोंधे व दिनेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भोसरी व परिसरातील ७० डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. लांडगे बोलत होते.

सदर कार्यक्रम इंद्रायणी नगर, भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता.

आमदार महेशदादा लांडगे यांनी ह्या वर्षी वाढदिवस साजरा न करता कोरोना योध्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा करणाऱ्या या लढवय्यांचे योगदान समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याला बळ देण्यासाठी काळात चांगले कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत असल्याचे मत आयोजक भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी व्यक्त केले.
युवा मोर्चा कोरोनाच्या काळात लोकांपर्यंत पोहाचवण्यामधे नेहमी अग्रेसर राहिलेले आहे . लोकांना उपचार असतील बेडची उपलब्धता मिळवून देण्यासाठी आम्हाला डॉक्टरांचे सहकार्य लाभले. अनेक रुग्ण सुखरूप आपल्या लोकांमधे आज आहेत ते डॉक्टरांनी केलेल्या सेवे मुळेच असे भोसरी चऱ्होली मांडलाचे अध्यक्ष उदय गायकवाड ह्यांनी नमूद केले. चिटणीस प्रकाश ह्यांनी डॉक्टरांनी केलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानले.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेंद्र लांडगे, विळसभाऊ मडीगेरी, महिला अध्यक्षा उज्वळताई गावडे, स्वीकृत नगरसेवक दिनेशभाऊ यादव, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, दत्ताभाऊ गव्हाणे तेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button