breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डेटींग साईटवरुन तिने केली ओळख, अन्ं अभियंत्याला 37 लाखांचा घातला गंडा

पुणे |महाईन्यूज|

डेटींग साईटवर ओळख झालेल्या महिलेने एकत्रीत व्यावसाय करण्याचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची तब्बल 37 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी मोबाईलधारक व्यक्ती व विविध बॅंकांच्या खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी येथील इवॉन आयटी पार्क येथील एका नामांकीत आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एका डेटींग सोशल ऍपवर खाते आहे. त्यातुन त्यांची एका महिलेशी ओळख झाली. तिने आपण लंडनमधील लॉईड बॅंकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीशी ओळख वाढली, त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. संबंधीत महिलेने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून तो व्यावसायासाठी गुंतवायचा असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना संबंधीत महिलेने दिल्लीत आल्यासे सांगून आपल्याकडे दहा हजार पौंड इतके परकीय चलन आहे. त्यामुळे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सोडवणूक करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठविण्यास सांगितले.

फिर्यादी यांना सीमाशुल्क, ऍन्टी मनी लॉंड्रींग सर्टीफिकेट, बॅंक प्रक्रिया शुल्क, आयकर, वस्तु व सेवा कर, डेबीट कार्ड ऍक्‍टीव्हेट चार्जेस, फायनान्स फॉर्म सिंगपेचर अशी वेगवेगळी कारणे सांगून 27 मार्च ते 29 जुलै 2019 या कालावधीमध्ये संबंधीत महिलेने 23 बॅंकांच्या खात्यामध्ये 37 लाख 54 हजार रुपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरण्यास भाग पाडले. त्यानंतरही पैशांची मागणी वाढू लागली. सातत्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे फिर्यादी यांना संशय आला, त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) बी.के.मांडगे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button