breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरी युवासेनेतर्फे करोना विषाणुपासून काळजी घेण्यासाठी सफाई कामगारांना मास्क वाटप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
दापोडी -करोना विषाणुंचा संसर्ग पुण्यात वाढत चालला आहे. त्यापासून खबरदारी घेणे महत्वाचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी युवासेनेतर्फे दापोडी-फुगेवाडीमधील सफाई कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी कैलास लांडे, अंकुश जाधव, गोरख नेटके, विनोद लोहिरे, अविनाश जाधव, रोहित गोरे, ज्ञानेश्वर मते, अविनाश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची यांनी केले.