ठाकरे सरकार आज दिल्ली दौऱ्यावर; मोदी-सोनिया गांधींची घेणार भेट
दिल्ली | महाईन्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शुक्रावारी राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
महाविकास आघीडीतील समन्वय राखण्याासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचे बोललं जातेय. गेल्या काही दिवासांपासून महाआडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधान आलं होतं. त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख आमदार सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे सोनिया गांधीना भेटण्यासाठी जाणार असल्यामुळे आघीडीत खरंच बिघाडी झाली का? याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे आंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेत त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.