breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे सरकारचा औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव सादर

मुंबई |

महापालिका निवडणुका आल्या की औरंगाबादचे संभाजीनगर करा, अशी मागणी झालेली नाही तर नवलच. युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये औरंगाबादचे संभीजनगर करण्याची अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यास राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुश्ताक अहेमद यांनी मुंबई उच्च न्यायलयात आव्हान दिले आणि हे नामांतर रखडले होते. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युतीचे सरकार आले, पण संभाजीनगर करण्याच्या फाईलवरील धूळ काही झटकली गेलेली नाही.

आता पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि मनसे या तीन पक्षांनी औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजेची आरोळी ठोकली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव मार्च 2020 मध्येच पाठवला होता. मात्र आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यावर पुन्हा सुरू झालेली आहे.

वाचा- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रविण राऊत यांच्या 72 कोटींच्या संपत्तीवर ED कडून जप्ती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button