breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ट्रॉमा सेंटरच्या अनधिकृत कामाची चौकशी करा – खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी.

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात होतात. या मार्गावर अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना तात्काळ प्राथमिक वैद्यकिय सेवा मिळावी म्हणुन  सार्वजनिक बांधकाम विभागाने ट्रॉमासेंटर बांधण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले. कॉग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी संबंधीत ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.

गेले अनेक वर्ष सदरचे ट्रॉमा सेंटर बांधण्यास लागले आहे. सदरच्या संबंधित ठेकेदाराने ट्रॉमासेंटरच्या जागे मध्ये अनेक अनाधिकृतपणे हॉटेल, फुडमॉल, शॉपींग सेंटर उभे केले आहेत. या ट्रॉमा सेंटर लगत अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना ने आण करण्यासाठी हेलीपॅड बांधले असुन सदर हेलीपॅड म्हणजे या फुडमॉलची पार्कींगची व्यवस्था झाली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील ट्रॉमासेंटर रूग्णांच्या मदतीसाठी उभारले नसुन ठेकेदाराला आर्थीक लाभ व्हावा या साठी ट्रॉमासेंटरचा उपयोग होतो. या ट्रॉमासेंटरच्या कामामध्ये कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार झाला असुन सद्या ट्रॉमासेंटरचा उपयोग रूग्णांच्या मदतीसाठी होत नसुन ठेकेदाराला यातुन लाखो रूपये उत्पन मिळत आहे.  ट्रॉमासेंटरची इमारत केवळ दिखावा असुन अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ इतर हॉस्पीटल मध्ये पोहचविणे हा मुळ उद्देश साध्य होत नसुन आजतागायत या हेली पॅड वर एकही हेलीकॅप्टर उतरले नाही. सदरची हेली पॅडची जागा फुडमॉल मध्ये येणाऱ्या गाडी पार्कींग साठी होत आहे.

या बाबत अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या येवून देखील याची दखल घेण्यात आली नाही. आज खासदार श्रीरंग बारणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे मंत्रालय़ात भेट घेवुन या ट्रॉमा सेंटर  मध्ये झालेल्या अनाधिकृत कामाची चौकशी करून या मध्ये झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. ट्रॉमा सेंटरच्या मुळ उदेशाला हरताळ फासला असुन ट्रॉमा सेंटर मध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामाची चौकशी करावी व पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात जखमी झाल्या रूग्णांना ट्रॉमासेंटरचा लाभ व्हावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे केली .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button