breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘ट्राय’चा नव्या नियमाविरोधात न्यायालयात धाव

मुंबई | महाईन्यूज |

‘ट्राय’च्या नव्या दरप्रणालीनुसार सुधारित दर सादर करण्यास दोन दिवस शिल्लक असताना त्याविरोधात भारतातील मोठय़ा ब्रॉडकास्टर्सनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी त्यांच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी ही याचिका सादर करण्यात आलेली आहे. त्या वेळी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे. न्यायालयानेही त्यांची ही विनंती मान्य करत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवलेली आहे.

झी एन्टरटेन्मेंट, स्टार इंडिया, सोनी नेटवर्क्‍स आणि अन्य महत्त्वाच्या ब्रॉडकास्टर्सनी ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन’च्या नेतृत्वाखाली ‘ट्राय’च्या नव्या दरप्रणाली विरोधात याचिका केलेली आहे. गेल्यावर्षी ‘ट्राय’ने लागू केलेल्या नियमावलीमुळे वाहिन्यांना २० दशलक्ष गमवावे लागले आहेत, असा दावा करत आता कुठे त्या नियमावलीनुसार झालेले बदल ब्रॉडकास्टर्स, ग्राहकांनी स्वीकारलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा दूरसंचार नियमन प्राधिकरणाने नवीन दरप्रणाली लागू केली असून यामुळे ब्रॉडकास्टर्सना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचा आरोप फेडरेशनने याचिकेत केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button