breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

टिकटॉक स्टार प्रतीक खत्रीचा धक्कादायक अपघाती मृत्यू

मुंबई – सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि टिकटॉक स्टार प्रतीक खत्री याचा भीषण कार अपघातात धक्कादायक मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री तो देहरादून येथील मेडिकल कॉलेजला जात असताना साखन कला येथे ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता. इन्स्टाग्रामवर त्याचे ४२ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

टिकटॉक स्टार प्रतीक मंगळवारी रात्री उशिरा देहरादून येथील मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी बागपतमधून निघाला होता. तो साखन कला येथे आला तेव्हा एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अशा जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आशिका भाटियानेही सोशल मीडियावर प्रतिकबरोबरचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button