Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र देवून कर्मचा-यांनी मिळविली पदोन्नती ; 117 जणांची होणार चाैकशी

– पालिका प्रशासन म्हणजे ‘आधळं दळतंय अन्ं कुत्र पीठ खातंय’ अशी अवस्था

– तत्कालीन सहाय्यक आयुक्तांचा भोंगळ कारभार 

पिंपरी ( विकास शिंदे ) – महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या आणि शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे पालिका प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र, लिपिक पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी अनेक कर्मचा-यांनी बोगस टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर करुन पदोन्नती मिळविली आहे. त्यामुळे पदोन्नती दिलेल्या 117 जणांच्या टंकलेखन प्रमाणपत्राची राज्य परीक्षा परिषदेकडून खातरजमा करुन दोषी आढळणा-यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.   

पिंपरी चिंचवड महापालिकेतील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने दोन महिन्यापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळावी, याकरिता टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन त्यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती.  तसेच त्या प्रमाणपत्राची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून खातरजमा करुन संबंधितावर कडक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी केली होती.

दरम्यान, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील एका कर्मचा-याने बोगस टंकलेखन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी इतर कर्मचा-यांना मदत केलेली आहे. याकरिता प्रत्येक टंकलेखन प्रमाणपत्रास सुमारे 20 हजार रुपये मोजल्याची चर्चा पालिका प्रशासन वर्तुळात सुरु आहे. काही कर्मचा-यांनी कारवाईच्या भितीने लिपिक पदावरील पदोन्नती रद्द करण्यासाठी रद्द करण्यासाठी पालिका प्रशासनात अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे पालिकेतील पदोन्नती दिलेल्या कर्मचा-याच्या टंकलेखन प्रमाणपत्र चाैकशी करुन दोषीवर कडक कारवाई मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button