breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झाड कोसळून एकाचा मृत्यू

अंगावर झाडाची फांदी कोसळून मालाड येथे एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शैलेश राठोड असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून आणखी एक जण या घटनेत जखमी झाला आहे.

मालाडमधील नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर सकाळी सहाच्या सुमारास झाडाची फांदी कोसळली. यादरम्यान तिथून शैलेश राठोड (वय ३८) जात होते. फांदी अंगावर पडल्याने त्यांना जीव गमवावा लागला. यात आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मुंबईत झाड कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना वारंवार घडत आहेत. जुलै २०१७ मध्ये कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जात असताना झाड अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला होता. तर ठाण्यात वकील किशोर पवार यांचा २३ जुलै २०१७ रोजी मृत्यू झाला होता. २०१७ ते २०१९ या कालावधीत मुंबईत झाड कोसळल्याने एकूण ८ जणांना जीव गमवावा लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button