Uncategorizedपिंपरी / चिंचवड

झटपट श्रीमंतीचे तरुणाला लागले वेड, बनावट नोटांचे मित्रामुळे फुटले बिंग

पिंपरी –  ग्रामीण भागातून येऊन मार्केट यार्डात बिगारी काम करताना अचानक बनावट नोटा हाताळण्यात आल्या आणि त्याच वेळेस कल्पना सुचली. हाच श्रीमंत होण्याचा शॉटकट मार्ग असून त्यानुसार त्याने रंगीत प्रिंटर विकत घेतला. 500 रुपयांच्या अनेक रंगीत नोटांच्या झेरॉक्‍स काढल्यानंतर हुबेहूब बनावट नोटा तयार करण्याचे तंत्र अवगत झाले. मात्र, मित्रांमुळे त्याचे भिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

सोलापूरातील करमाळा येथील धारासिंग अर्जुन सुकळे (वय 30, रा. ढमाळवाडी, हडपसर, मूळ. रा. चौधे, ता. करमाळा) तरुणाची. धारासिंग हा पुणे मार्केट यार्डात बिगारी काम असे. हडपसरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. एक दिवस त्याला एकाने बनावट नोटा दिल्या. त्यावेळी त्याने ठरवले की, आपणही बनावट नोटा तयार करून लोकांना फसवू शकतो आणि काही काळात श्रीमंत होऊ शकतो. त्यानुसार त्याने रंगीत प्रिंटर खरेदी केला. अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याला हुबेहूब बनावट नोटा तयार करण्याचे तंत्र अवगत झाले. मागील दोन महिने हा प्रकार सुरू होता.

तयार झालेल्या नोटा त्याने मित्र नीलेश विजय बनसोडे (वय 26, रा. भेरटवस्ती, साडेसतरानळी, हडपसर, मूळ रा. लातूर) आणि अजय दयानंद शिरसल्ले (वय 21, रा. गाडीतळ, वेताळबाबची वसाहत, हडपसर) यांना खर्च करण्यासाठी दिल्या. सोमवारी या मित्रांनी दापोडीतील एका फळ विक्रेत्याला 500 रुपयांची बनावट नोट दिली. मात्र, संशय आल्याने त्याने पोलिसांशी संपर्क केला असता भोसरी पोलिस त्वरित घटनास्थळी पोचले. नीलेश व अजय यांना ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत तीन हजार किमतीच्या सहा नोटा त्यांच्याजवळ मिळाल्या. खाक्‍या दाखवताच याप्रकरणाचा मास्टरमाईंड धारासिंग असल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश खारगे व पथकाने धारासिंगला अटक करत रंगीत प्रिंटर, नोटा छापलेले कागद जप्त केले. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने  सोमवारपर्यंत (ता. 17) पोलिस कोठडी सुनावली. त्यांनी आत्तापर्यंत किती नोटा चलनात आणल्या आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button