राष्ट्रिय

जैशच्या दोन संशयीतांना अटक

जम्मू : पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून जैश ए महंमदच्या दोन समर्थकांना अटक केली आहे. पोलिसांनी कठुआ मध्ये जैश ए महंमदच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या या आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

या संशयीतांमध्ये एका ट्रक चालकाचाहीं समावेश असून तो जैशच्या समर्थकांना पंजाबातून ट्रक मधून काश्‍मीर मध्ये आणण्याचे काम करीत होता.सुहिल अहमद असे त्याचे नाव आहे. त्याच्यासमवेत अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव अहमद लोने असे असून ते दोघेही पुलवामा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. जैश ए महंमदसाठी काम करणारे एक मोठे नेटवर्क या कारवाईतून उघड होण्याची शक्‍यता असून या प्रकरणात आणखीही काही जणांना अटक केली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button