breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जेडीयूकडून गुप्तेश्वर पांडे यांना डच्चू, विधानसभेची निवडणूक पांडे लढणार नाहीत

पाटणा – अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट अखेर कापण्यात आले आहे. बक्सरमधून निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेशही केला होता.

मात्र, जेडीयूने सर्व १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव यात नाही आहे. विशेष म्हणजे ज्या बक्सरमधून ते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. त्या जागेवर भाजपने परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी आपण यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे फेसबूकवर जाहीर केले आहे.

बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जनता दल (संयुक्त) व भाजपा या दोन्ही पक्षांनी निवडणुकीपासून दूर ठेवले आहे. सुशांत सिन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले पांडे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू झाली होती. निवडणूक जवळ आल्यानंतर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेत जदयूमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना जदयूकडून तिकीट मिळण्याची शक्यता होती.

गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, एनडीएच्या जागावाटपात बक्सर मतदारसंघ भाजपाकडे गेला. त्यात जदयूनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पांडे यांचा पत्ता कापण्यात आल्याचं समोर आलं. पण भाजपाकडून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, भाजपानं बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून पांडे यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

“माझ्या शुभचिंतकांच्या फोनमुळे त्रस्त झालो आहे. मी त्यांची चिंता आणि समस्या समजू शकतो. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सगळ्यांना अपेक्षा होती की, मी निवडणूक लढवेल. पण यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. हताश आणि नाराज होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. संयम ठेवा. माझं जीवन संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर जनतेची सेवा करत राहिल. संयम ठेवावा व मला फोन करू नये. माझं जीवन बिहारच्या जनतेला समर्पित आहे,” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button