breaking-newsराष्ट्रिय

जेएनयू आंदोलनात नागरी संघटनाही सहभागी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वसतिगृह व खानपान शुल्क वाढीच्या विरोधात शनिवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.नागरी समुदाय, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व विद्यमान विद्यार्थी यांनी एकत्र जमून घोषणाबाजी केली.  विद्यापीठ प्रशासनाने शुल्कवाढ मागे  घ्यावी ,  शिक्षण सर्वाना परवडणारे असावे अशी मागणीही या वेळी करण्यात आली. नागरी समुदायाच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ होती.

गेले काही दिवस जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शुल्कवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. निदर्शक मंडी हाऊस येथे जमले व तेथून ते संसदेच्या दिशेने निघाले. या वेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कनॉट प्लेसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे लावले होते. एसएफआय, केवायएस, एआयएसएफ व एनएसयूआय या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रीय जनता दल व भीम आर्मी हा दलित गट यांचेही कार्यकर्ते आंदोलनात सामील होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button