breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं- नाना पाटेकर

मुंबई | जेएनयूमधील हिंसाचाराने पुन्हा एकदा वाद पेटला आहे. जेएनयूमध्ये अज्ञातांनी हल्ला करून विद्यापीठाचे नुकसान केले एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. यामध्ये विद्यार्थी नेता आइशी घोष जबर जखमी झाली. जेएनयूमधल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले आहेत.

मुंबई-पुण्यातही या हल्ल्याच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं रात्रीच्या सुमारास कँडलमार्च काढण्यात आला. या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावर ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना म्हणतात,’विद्यार्थी म्हणून आम्हीही होतो आणि तुम्हीही आहात. मुळामध्ये आपले आई-वडिल कोणत्या परिस्थितीतून जात असताना आपल्याला शिकवतात हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. कारण आम्हाला आता जर का कोणत्या राजकीय पक्षाने लोटलं तर आमचं विद्यार्थी म्हणून करिअर जातं. हे विद्यार्थ्यांना कळतं नाही. हे राजकीय पक्ष सोडायला येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button