breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जुन्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन – खा. अमर साबळे

  • श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचची स्थापना
  • भाजपच्या पदाधिका-यांचा सन्मान सोहळा संपन्न

पिंपरी, (महाईन्यूज) – शासनाच्या योजनांचा लाभ त्याचप्रमाणे आगामी काळात मिळणाऱ्या संधी जास्तीत जास्त जुन्या कार्यकर्त्यांना कशा मिळतील, यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून आजचा हा सन्मान खऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. हा सन्मान माझ्या कायम लक्षात राहील, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी येथे केले.

भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी विचार मंच संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या कामकाजाची माहिती घराघरात पोहोचविली जाणार आहे. तसेच प्रत्येक नागरिक भाजपशी जोडला जाण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे. यावेळी राज्यसभा खासदार अमर साबळे यांची प्रतोतपती फेरनिवड झाल्याने पक्षाचे आजी-माजी शहराध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी (दि. 22) सायंकाळी 7 वाजता ऑटोक्लस्टर हॉल चिंचवड या ठिकाणी संस्थेची स्थापना आणि सत्कार समारंभ पार पडला. यावेळी भाजपचे सर्व माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण नाईक, मधुजी जोशी, अमृत पऱ्हाड, प्रतिभा लोखंडे, एकनाथ पवार व सदाशिव खाडे या सर्वांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, विधी समिती अध्यक्ष अश्विनी बोबडे, ह प्रभाग अध्यक्ष योगीता नागरगोजे, शहर सुधारणा समिती अध्यक्ष राजेंद्र लांडगे या सर्वांचा देखील सत्कार करण्यात आला. दिप प्रज्वलन सर्व सत्कारमूर्ती, प्रदेश चिटणीस उमा खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी व कार्यक्रमास उपस्थित नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, रवी लांडगे, संदिप वाघिरे, अनुराधा गोरखे, संदीप कस्पटे, भाजप प्रथम शहर अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण नाईक, ज्येष्ठ नेते मधु जोशी, प्रतिभा लोखंडे, अमृत पऱ्हाड, निवृत्ती राऊत, वसंत शेवडे आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले. तर, आभार नगरसेवक माऊली थोरात यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button