breaking-newsमहाराष्ट्र

जहाल नक्षलवादी कमांडर पहाडसिंग शरण

महाराष्ट्र:- नक्षलवादी चळवळीच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड (एमएमसी) झोनचा प्रमुख, गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया व गडचिरोली जिल्हय़ाच्या सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व तिन्ही राज्य मिळून ५० लाखांपक्षा पेक्षा अधिक बक्षीस व ८० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेला जहाल नक्षलवादी कमांडर पहाडसिंग याने छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

जवळपास १५ वर्षांपूर्वी म्हणजे २००३ मध्ये नक्षलवादी चळवळीत दाखल झालेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग ऊर्फ अशोक ऊर्फ टिपू सुलतान ऊर्फ बाबुराव तोफा हा लवकरच आत्मसमर्पण करणार असल्याच्या बातम्या २०१४ मध्येच प्रसार माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. मात्र, याच दरम्यान २०१५ मध्ये  पहाडसिंगवर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड अशी तीन राज्ये मिळून नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या झोनच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गोंदिया, बालाघाट, राजनांदगाव व अन्य काही जिल्हय़ांच्या सीमावर्ती भागाचा त्यात समावेश आहे. तेव्हापासून तो बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करीत होता. पहाडसिंगच्या नावावर ८० पेक्षा अधिक गुन्हय़ांची नोंद असून १५ वर्षांत त्याने अनेकांचे जीव घेतले आहेत. पोलिसांशी झालेल्या अनेक चकमकीमध्ये तो अग्रस्थानी राहिला आहे. गडचिरोली पोलिसांनी त्याच्यावर १६ लाखांचे तर छत्तीसगड पोलिसांनी २५ लाखाचे बक्षीस ठेवले होते.

महाराष्ट्र पोलिसांना खबरच नाही

पहाडसिंगने बऱ्याच दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केले असून तेव्हापासून तो छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात असल्याची चर्चा आहे. या काळात छत्तीसगड पोलीस पहाडसिंगला घेऊन लपवून ठेवलेले शस्त्रसाठे व पैसा शोधण्यासाठी जंगलात फिरले. त्यामुळे या कालावधीत छत्तीसगड पोलिसांना किती शस्त्रसाठे सापडले व नक्षलवाद्यांनी जंगलात दडवून ठेवलेली किती रक्कम मिळाली, याबाबत पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत. तसेच छत्तीसगड पोलिसांनी गडचिरोली तथा महाराष्ट्र पोलिसांना आत्मसमर्पणाबाबत काहीही कळवले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button