breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळकोट तालुक्यातील रस्ते दर्जेदार करण्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे ‘ऍक्टिव्ह’

उदगीर | महाईन्यूज | प्रतिनिधी

जळकोट तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागांनी एकत्रीत बसून रस्त्यांचे वर्गीकरण करुन जळकोट तालुक्यातील गावांना जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार व्हावेत याकरिता प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करावेत. तालुक्यातील सर्व नागरिकांना लवकरात लवकर दळणवळणासाठी चांगले रस्ते उपलब्ध्‍ करुन द्यावेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, जळकोट तालुक्याचा बहुतांश भाग हा डोंगरी आहे. या भागातील ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे. तसेच या भागात विकास कामे झालेली नाहीत. तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुका प्रशासकीय यंत्रणांनी जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासांसाठी आपल्या विभागामार्फत विकासात्मक योजना राबवाव्यात. व या भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशीलता ठेवून लोकसेवकाची भूमीका बजवावी, असे आवाहन त्यांनी केले.
जळकोट तालुका प्रशासकीय इमारतीच्या कामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सादर करावा. ही इमारत वर्षभरात पूर्ण होईल याकरिता संबंधितांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले. जळकोट नगर पंचायतीने शहरातील नागरिकांना सर्व पायाभुत सुविधा चांगल्या मिळाव्यात याकरिता पुढाकार घ्यावा. तसेच विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असेही निर्देशित केले.
जळकोट येथील आरोग्य विभागाने या भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा दयाव्यात. याकरिता आवश्यक मशिनरी व वैद्यकीय अधिकारी यांची मागणी करावी तसेच जळकोट तालुक्याला लवकरच नवीन रुग्ण्वाहिका उपलब्ध्‍ करण्यात येतील, त्याप्रमाणेच सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी रिक्त पदांची माहिती दयावी, असे ही सूचित केले.
जळकोट तालुक्यात रोजगार हमी योजनेतून मोठया प्रमाणावर कामे प्रसतावित करावीत. या भागातील एक ही मजूर काम नाही म्हणून बेरोजगार राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कांदलीकर यांनी जळकोट तालुक्यातील राज्य व जिल्हा प्रमुख रस्त्यांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते, त्यावरील सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. नवीन कामे लवकरच प्रस्तावीत करण्यात येतील असे सांगितले. यावेळी जळकोट तालुक्यातील पंचायत समिती सभापती व इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी तालुक्यातील विविध समस्या मांडून वेळेत कामे पूर्ण करण्याची मागणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button